Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चांदापूर येथे शिवजयंती महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, शिवगर्जना बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

चांदापूर येथे शिवजयंती महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, शिवगर्जना बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

मूल प्रतिनिधी


मूल तालुक्यातील चांदापूर येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक १७ फेब्रुवारीला शिवगर्जना सांस्कृतिक, कला, क्रीडा व बहुउद्देशिय संस्थेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला व सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिनांक १८ फेब्रवारीला चांदापूर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेली पायऱ्यांची विहीर ही अडगळीत पडलेली होती . त्या विहीरीची सफाई करून विहीरी सभोवती तारांची जाळी बसवण्यात आली. व दिनांक १९ फेब्रुवारीला दुपारी १२ : ०० वाजता विध्यार्थ्याच्या तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . त्यानंतर ठिक ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेत शिवगर्जना संस्थे सोबतच संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व गुरुदेव सेवा मंडळाचे भजन मंडळी यांनी मिरवणूकीत दिंडी काढली. गावातील महिला लेझिम पथकांसह शोभायात्रेत सहभागी झाल्या त्याबरोबरच गावातील बहुसंख्य युवक युवती , प्रतिष्ठीत व्यक्ती व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले . शोभायात्रा दिड तास संपूर्ण चांदपूरमध्ये फिरवण्यात आली. त्यानंतर लगेचच दायीआई यांचा साडी देऊन व आशाताई यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विध्यार्थ्यांचा मुमेंटो व प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले . त्याचप्रमाणे रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ . सौ. अभिलाषाताई गावतुरे मॅडम, उदघाटक सौ. सोनीताई देशमुख सरपंच, अध्यक्ष श्री . खुशालराव शेरकी माजी सरपंच, विशेष अतिथी ज्ञानदेव अर्जूनकार, विनायकराव झरकर , गणपतराव पाल, मारोतराव शेरकी, राजु पोटे, वंदनाताई कोरेवार, वेणूताई चिंचोलकर, सुनिताताई कडूकार, ब्रम्हानंद मडावी, शामराव शेरकी, नवनित चिंचोलकर, ताराचंद शेडमाके, रविंद्र शेरकी, अनिल नैताम मुख्याध्यापक, सुरेश जिल्हेवार स.शि. प्रियंका वाळके, सिंधुबाई गेडाम, विद्याताई पोटे. यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. यासाठी दिलीप पाल, नंदकिशोर शेरकी, पंकज निशाने, सुरेश देशमुख, वसंत पोटे, देविदास देशमुख,अंकुश शेरकी, बंडू पोरटे, मनोज शेरकी, धर्मेंद्र घोगरे,अभिजित चिंचोलकर, दिवाकर केळझरकर, आशिष पाल, दुर्योधन कोहपरे, दिलीप पोटे, नितेश चिंचोलकर, दिनकर झरकर, धनराज निशाने, किशोर कडूकार,एश्वित शेरकी, रोशन पोरटे, कमलेश चुदरी,जय पाल, नागेंद्र घोगरे, शुभम देशमुख त्याचप्रमाणे शिवगर्जना बहुउदेशीय संस्था, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान, गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments