Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कराटे एंड फिटनेस क्लब मध्ये बेल्ट आणि प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम

कराटे एंड फिटनेस क्लब मध्ये बेल्ट आणि प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम

मूल (अमित राऊत)


जूंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे डो असोसिएशन मूल ला संलग्नित कराटे एंड फिटनेस क्लब मूल येथे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बेल्ट ग्रेडिंग परीक्षा मुख्य परीक्षक शिहान विनय बोधे आणि अन्य परीक्षक मुहफिझ सिद्दीकी,मंजीत मंडल आणि नरेश थटाल यांच्या मार्गदर्शनात पार पडली ह्या परीक्षेत क्लब चे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २१ फेब्रुवारी २०२४ रोजी कराटे एंड फिटनेस क्लब मूल मध्ये बेल्ट आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा.प्रा.हरीश रायपुरे सर (प्राचार्य,छ.शाहू महाविद्यालय,चंद्रपूर) आणि मा.नासिर खान सर (संस्थापक अध्यक्ष,उम्मीद मल्टिपर्पज फाउंडेशन तथा प्रतिनिधी पत्रकार,नवभारत) ह्यांचे हस्ते विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत पार पडले.ज्यात एकूण ५५ खेळाडूंनी परीक्षा उत्तीर्ण करुन प्रमाणपत्र मिळविले आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना क्लब चे मुख्य प्रशिक्षक इम्रान खान ह्यांनी परीक्षेची रूपरेषा आणि तयारी कशी केली जाते हे पालक आणि पाहुण्यांना समजावून सांगितले तसेच गेल्या काही वर्षांपासून क्लब ला अत्याधुनिक करण्याकरिता केलेले प्रयत्न सांगत त्यांनी भविष्यात आणखी मोठ्या संख्येत उच्च दर्जाचे कराटे खेळाडू तालुक्याला मिळणार असल्याचे मत व्यक्त केले.प्राचार्य हरिश रायपुरे सर ह्यांनी आपले मत व्यक्त करताना आधीच्या काळात क्रिडा क्षेत्रात ह्या सुविधा आणि संधी नव्हत्या आता शिक्षण आणि नोकरी मध्ये क्रीडा कोटा आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले तर मा.नासिर खान ह्यांनी पुढल्या सत्रापासून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी खेळाडूंसाठी उम्मीद मल्टिपर्पज फाउंडेशन कडून लवकरच क्रीड़ा-शिष्यवृत्ती घोषित केली जाणार असल्याचे म्हटले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरती भोयर हिने केले तर आभार प्रदर्शन क्लब चे प्रशिक्षक निलेश गेडाम यांनी केले.कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था साक्षी गुरनुले,अमान खान आणि नैतिक धोबे ह्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने केली.

Post a Comment

0 Comments