Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बोरचांदलीत महिलांनी पकडली अवैध दारू महिला एकवटल्या,दोघांविरूदध गुन्हा दाखल

बोरचांदलीत महिलांनी पकडली अवैध दारू
महिला एकवटल्या,दोघांविरूदध गुन्हा दाखल

मूल :- प्रतिनिधी


तालुक्यातील बोरचांदली येथे महिलांनी शुक्रवारी रात्री अवैध दारू पकडली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 25 नग रॉकेट संत्रा दारू जप्त केली. मूल पोलिस ठाण्यात   दोघांविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरचांदली येथील महिला गावातील अवैध दारूच्या विक्रीने त्रस्त झालेल्या होत्या.गावातील सामाजिक सलोख्यावर याचा परिणाम झालेला होता. कौटुंबिक भांडणामध्ये भर पडली होती.तसेच युवा वर्ग दारूच्या आहारी गेलेला होता. त्याविरूदध महिलांनी एल्गार पुकारून मूल पोलिस ठाण्याच्या माध्यमातून पोलिस अधिक्षक आणि तहसिलदार यांना शंभर महिलांच्या सहीचे निवेदन सादर केले होते.बंदोबस्त आणि कारवाईची मागणी केली. सोबत अवैध दारू विक्रेत्यांच्या बारा जणांची यादीही जोडली होती. अवैध दारू विक्रेत्यांच्या पाळतीवर महिला होत्याच.शुक्रवारी रात्री एका हॉटेल मध्ये अवैध दारूचा गोरखधंदा होत असल्याचे त्यांना कुणकुण लागली.येथील महिलांनी कंबर कसून हॉटेलवर धाड टाकली.हाटेल  परिसरात एका स्कूल बॅगेत त्यांना 25 नग रॉकेट संत्रा आढळून आल्या.त्यांनी लगेच मूल पोलिस ठाण्यात याची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून 25 नग रॉकेट संत्रा दारू मुददेमालासह 875 रू.किंमतीची जप्त केली.तपासा दरम्यान, येथील अवैध दारू विक्रेता मिलींद राजाराम खोब्रागडे,रा.मूल आणि दया विठठल ठेमस्कर,रा.बोरचांदली या दोघांविरूदध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments