Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बोगस कापूस बियाणे जप्त, कृषी विभागाची कार्यवाही

बोगस कापूस बियाणे जप्त, कृषी विभागाची कार्यवाही

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यांतील चांदापूर येथे गुणनियंत्रण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रविकुमार गोटेपट्टी यांचे शेतात तपासणी केली असता मिरची व कापूस लागवड केलेल्या शेतात असलेल्या स्लॅबच्या घराच्या बाजूला उभ्या केलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर मध्ये दहा पोते खुले  अनधिकृत HTBT कापूस बियाणे आढळून आले.

बियाण्याचे एकूण वजन पाच क्विंटल आहे. सदर बियाण्याची किंमत ८ लाख 48 हजार इतकी, ट्रॅक्टर व ट्रॉली सह 13 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पोलीस स्टेशन मुल येथे जमा करून एफ आय आर दर्ज करण्याची  कार्यवाही सुरू आहे. सदर कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर श्री शंकरराव तोटावार यांचे मार्गदर्शनाखाली वरील कार्यवाही करण्यात आली. 

या कार्यवाहीच्या वेळी श्री.वीरेंद्र राजपूत कृषी विकास अधिकारी, चंद्रपूर श्री. प्रशांत कासराळे तालुका कृषी अधिकारी मुल श्री लंकेश कटरे मोहीम अधिकारी, चंद्रपूर श्री श्रावण बोडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक चंद्रपूर श्री किशोर चौधरी कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, श्री सुनील कारडवार कृषी अधिकारी पंचायत समिती मुल, श्री प्रकाश पराते कृषी पर्यवेक्षक, मूल श्री विनोद निमगडे, कु. कविता सातपुते कृषी सहायक मुल आणि चमू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments