Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शिवजयंती निमित्त मूल च्या कवियत्री माधुरी लेनगुरे यांनी रचलेली "शिवबा" कविता

शिवजयंती निमित्त मूल च्या कवियत्री माधुरी लेनगुरे यांनी रचलेली "शिवबा" कविताबाळकडू संगोपाया
माता जिजाऊ धावली..
स्वातंत्र्याचा ध्वज घेऊ
धन्य धरती पावली..

राजा दख्खनचा शिवा
शत्रू लोळवितो पहा..
जाती जातीतून उभा
पाठीराखा झाला पहा..

जय जय शिवराया
मावळ्यांना अभिमान
कोटिकोटि दंडवत
छत्रपती बलवान..

रायगड उभा असा
उंच उभारुनी माथा..
सज्ज स्वागतास उठे
स्वातंत्र्याची गातो गाथा..

शिवनेरी सजलेली
शिवमंगलात गाया..
तूच प्राण अभिमान
आम्हावरी तुज छाया..

© माधुरी लेनगुरे
💫 नक्षत्र

Post a Comment

0 Comments