Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सेंट ॲन्स हायस्कूल मुलच्या विद्यार्थ्यांची कर्करोगग्रस्त रग्णांना आर्थिक मदत

सेंट ॲन्स हायस्कूल मुलच्या विद्यार्थ्यांची कर्करोगग्रस्त रग्णांना आर्थिक मदत

मूल : प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना विविध आजारांचा  सामना करावा लागतो.या आजारांचे पैशांच्या अभावी निराकरण होत नाही.पैशाची जुळवाजुळव करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते आणि पैशाअभावी कधीकधी जिवाला मुकावे लागते.अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था मदतीकरिता पुढाकार घेत असतात.
     कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करणारी अशीच एक नामांकित संस्था पराकाष्ठा फाउंडेशन,लखनौच्या माध्यमातून सेंट ॲन्स हायस्कूल मुलच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सि. शॅलेट सेबॅस्टियन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ ला  शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी गोळा केलेले १,१०,६४० रुपये मदत म्हणून देण्यात आले.
     पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी जी रक्कम गोळा  केली,शाळेच्या वतीने आज शाळेच्या व्यवस्थापिका रेव्ह.सि.लिली सेबॅस्टियन यांचे द्वारा पराकाष्ठा फाउंडेशनचे श्री प्रकाश देशमुख पांडे यांना सुपूर्द करण्यात आली.
     सर्वात जास्त रक्कम गोळा करणारे वर्ग पहिली ते नववीचे विद्यार्थी अनुक्रमे अन्विती घोंगे,शरयू माहुरपवार,अरीना मिस्त्री, अनन्या कुंभरे,राज येरोजवार,श्लोक रायकंटीवार,तन्मय नामपल्लिवार,स्मित रामटेके व क्रिती निमगडे यांना प्रमाणपत्र व उचित बक्षीस देण्यात आले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कामिडवार यांनी तर उपस्थितांचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस कोकाटे ने मानले.
      आर्थिक मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सि.शॅलेट सेबॅस्टियन,शिक्षक व पालकांनी खूप कौतुक केले.शाळेच्या वतीने समस्त पालकांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments