Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी tractor-bicycle accident

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यातील नवेगाव(भु.) बस स्थानकासमोर ट्रॅक्टर दुचाकी चा अपघात झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. घटनेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीचे नाव साधू शंकर झाडे वय वर्ष 31 राहणार येरमनार पोस्ट पेरमीली तालुका आहेरी जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहे.

जखमीला मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे. बातमी लीहेपर्यंत ट्रॅक्टर चालकावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments