Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अमृत महोत्सव वर्षानिमित्त सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम

अमृत महोत्सव वर्षानिमित्त सत्कार व सांस्कृतिक 

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यांतील चांदापूर येथील शाळेला ७५ वर्ष पुर्ण झाल्या प्रित्यर्थ अमृत महोत्सवी वर्ष म्हणून जि प.उच्च प्राथमिक शाळा चांदापूर येथील मुख्याध्यापक अनिल नैताम सर, सुरेश जिल्हेवार सर, सुनिल निमगडे सर, रुपेश परसवार सर, कविता रोकमवार मॅडम व ज्योती सुर्यवंशी मॅडम यांच्या प्रयत्नातून विध्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव व चांदापूर येथील सुपुत्र जेष्ठ सेवाव्रती व सेवाव्रती यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला . या कार्यक्रमासाठी चांदापूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सोनीताई देशमुख, उपसरपंच अशोकराव मार्गनवार, पोलीस पाटील ज्ञानदेव अर्जुनकार ह.भ.प . मुर्लीधर कार्तीक स्वामी,शा व्य अध्यक्ष ताराचंद शेडमाके, उपाध्यक्ष रक्षालीताई पाल, सुनिता कडूकार, प्रतिक्षा नागापूरे, वंदना कोरेवार , विनोद कोहपरे,प्रफुल तिवाडे, ब्रम्हानंद मडावी सर्व सदस्य ग्राम पंचायत, सुरेश देशमुख, गजानन भोयर, संदीप पाल, प्रमोद गेडाम, पद्माकर शेडमाके, सौ . लाटेलवार ताई, नंदेश्वर ताई सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे विनायकराव झरकर, खुशालराव शेरकी माजी सरपंच व राजू पोटे, दिलीप पाल,माजी उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवाव्रतीचा सत्कार सोहळा पार पडला. सर्व प्रथम सेवानिवृत्त मनोहरजी पाल, अशोकजी पाल, राजूजी मडावी, वामनराव शेरकी यांचा मानवस्र श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यानंतर दिनकरजी चामलवार, सदनजी मुनगेलवार, मनोज कुमरे, विजय मडावी, नंदकिशोर शेरकी, लोमेश मिडपलवार, नितीन शेरकी, सदानंद पाल, रविंद्र कंकलवार, विनोद कोहपरे, चांगदेव चिंचोलकर, शिल्पाताई चिंचोलकर, उमेश कडूकार, धनंजय लेनगुरे व MBBS साठी नंबर लागलेले गौरव मर्लेवार या सर्वांना मानवस्र , श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला .

सर्व सेवाव्रतीनी असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल चांदापूर शाळेच्या सर्व शिक्षक वृदांचे कौतुक केले व गावातील तरुण आणि विघ्यार्थी यांच्याशी हितगुज करून आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी असून या शाळेसाठी देणेकरी लागतो व आपल्या गावची शाळा ही तालुक्यातुनच नाही तर जिल्ह्यातून प्रथम यावी . व प्रत्येक पालकांनी शाळेप्रती जिव्हाळा ठेवावा व आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष दयावे . असा भाव व्यक्त केला . त्याचप्रमाणे गावातील जुन्या वारसांचे जतन करावे असे मत व्यक्त केले .
या कार्यक्रमा प्रसंगी गावातील बहुसंख्य प्रतिष्ठीत नागरीक माजी पदाधिकारी, वयस्क व तरुण त्याचप्रमाणे सर्व महिला व सर्व विध्यार्थी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments