Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पोलीस अधीक्षकांची रेती घाटावर धडक कार्यवाही, दीड कोटींचा मुद्देमाल केला जप्त

पोलीस अधीक्षकांची रेती घाटावर धडक कार्यवाही, दीड कोटींचा मुद्देमाल केला जप्त

मूल (अमित राऊत)


मूल तालुक्यातील गोंडसावरी गावाजवळ असलेल्या नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन करताना एक पोकलॉन, तीन हायवा, एक बोलेरो वाहन असा एकुण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सहा आरोपीना पकडण्यात आले असून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 20 तारखेच्या रात्रो तीन वाजता चे सुमारास स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केली आहे.

या मोठ्या कार्यवाहीने चंद्रपूर जिल्ह्यात रेतीमाफीयांमध्ये खळबळ माजली आहे. साध्या ड्रेसवर देशांतर करून खाजगी वाहनाने पोलीस अधीक्षक यांनी गुप्त माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडसावरी येथे अवैध रेतीच्या तस्करीला चाप लावण्याकरिता मोठी कार्यवाही केली आहे.

पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला या आधीच कार्यवाही संदर्भात सूचना दिल्या होत्या, मात्र अपवाद असलेल्या पोलीस यंत्रणेला ते आता स्वतः हाताळणार असल्याचे या धडाकेबाज कार्यवाहीतून इशारा दिला आहे. पुढील कार्यवाही मूल पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

0 Comments