Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रा.शाम धोपटे यांनी दिला प्रभावी भाषणाचा मूलमंत्र, स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब चे आयोजन

प्रा.शाम धोपटे यांनी दिला प्रभावी भाषणाचा मूलमंत्र, स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब चे आयोजन

मूल (अमित राऊत)


प्रभावी संवाद किंवा प्रभावी भाषण कसे करायचे, स्टेज डेरिंग कशी येणार, बोलायचे कसे, हावभाव कसे असले पाहिजे, असा एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलमंत्र प्रा. श्याम धोपटे यांनी स्नेहबंध अँड कल्चरल फॅमिली क्लब यांच्या वतीने पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दिला. 

पुढे बोलताना प्रा.शाम धोपटे म्हणाले की, स्वतःमध्ये आणि बोलण्यात आत्मविश्वास असला पाहिजे. प्रभावी भाषन हे प्रत्येकाला आवश्यक असते. यामध्ये राजकीय वक्ते, शिक्षक, पत्रकार, व्यापारी प्रत्येकाचा समावेश असतोच. माणसांमध्ये विविध गुण आहे. बऱ्याच गोष्टी माणसाला शक्य होते मात्र त्याला कमांड देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशक्य गोष्टही शक्य होते. विविध उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण देताना प्रा.धोपटे हे स्वतः उपस्थितांमध्ये जाऊन अबोल व्यक्तींना बोलके केले. हे विशेष!

स्नेहबंध सोशल अँड कल्चरल फॅमिली क्लब मुल तर्फे वर्षभरात विविध उपयोगी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चे आयोजन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून प्रभावी भाषण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे वक्ते चंद्रपूर येथील प्राध्यापक शाम धोटे हे होते. यावेळी मंचावर स्नेहबंध फॅमिली क्लबचे अध्यक्ष संजय येरोजवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्नेहबंध चे निलेश रॉय तर आभार नितीन राजा यांनी मानले. प्रशिक्षणाला स्नेहबंध चे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments