Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जिल्हा परिषद शाळा लोंढोली येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न, नृत्य व नकलांच्या माध्यमातून प्रबोधन

जिल्हा परिषद शाळा लोंढोली येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न, नृत्य व नकलांच्या माध्यमातून प्रबोधन

मूल (अमित राऊत)

जि .प .उच्च प्राथमीक शाळा लोंढोली येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक उस्टू पेंदोर सरपंच ग्रामपंचायत लोढोली हे होते. सह उद्घाटक प्रमोदजी खोबे उपसरपंच तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय दुधबळे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे होते.

कार्यक्रमाचे उदघाटक उष्टूजी पेंदोर यांनी आपल्या मार्गदर्शनातून  शाळा ही समाज घडवण्याची काम करणारी एकमेव संस्था आहे. शाळा आणि समाजात एकोपा असला की गावाची नक्कीच प्रगती होते विद्यार्थ्यांनी कधी स्वतःला कमी मानू नये. मेहनतीने निश्चितच यश मिळते. आपली शाळा ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी विविध उपक्रम राबवणारी शाळा आहे यातील सर्व शिक्षकांनी मिळून या शाळेचा गेल्या दोन वर्षांमध्ये कायापालट करून शाळेची उत्तम अशी प्रगती साधलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भाऊ दुधबळे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शाळेची प्रगतीचा पाढा वाचला सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नीरे सर यांनी केले. शाळेत राबवले जाणारे विद्यार्थी हिताचे सर्व उपक्रमाची माहिती दिली. नुकत्याच झालेल्या नवरत्न स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळच्या सत्रामध्ये  ग्रामपंचायतच्या वतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. माता पालक याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नकलाच्या माध्यमातून अंधश्रद्धा शिक्षण व व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजनात्मक प्रबोधन केले. सोबतच आदिवासी नृत्य कोणी नृत्य देशभक्तीपर रिमिक्स,शिवरायांच्या जीवनावर नाटिका,अशा विविध प्रकारचे आकर्षक नृत्य प्रकार सादर करून उपस्थित संसमुदायांचे मनोरंजन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या सूप्त गुणाची झलक दाखवली अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्य सादर करून गावातील लोकांचे मन जिंकलेत.
 हुंडा पद्धतीला आळा बसवा म्हणून ' हुंडा बंदी' ही नाटक सादर करण्यात आली. 'बेटी बचाव बेटी पढाव' यासाठी एक सुंदर नृत्य सादर करण्यात आले.या कार्यक्रमाच्या मध्यामतून जवळपास 85 हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा  झाली.
व्यासपीठावर गावातील विशेष अतिथी म्हणून शंकरराव बोदलकर माननीय गोकुळदास भुरसे माननीय पुरुषोत्तम बोदलकर, राजेंद्रजी बोदलकर, मनोज पाटील खोबे मा.दिलीप भाऊ लटारे राजूभाऊ बोधलकर ,शालिनीताई खोबे गीता ताई मडावी ,शिल्पाताई भांडेकर निकिता ताई गेडाम, अरुणजी गव्हारे ,प्रशांत भाऊ गोवर्धन ,शालू ताई ठाकूर ,भारतीताई ठाकूर , भांडेकर ताई,दामिनी ताई ठाकूर किरण ताई आत्राम, गीता ताई गोवर्धन, जयश्रीताई वासेकर  घोंगडे ताई,गंगाधर  कुकडे चंद्रशेखरजी रामटेके ,माजी शिक्षक श्री माननीय सुनील चूनारकर सर  मुख्याध्यापक गाढवे सर सिद्धार्थ हायस्कूल तथा सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मानगुडधे सर यांनी केले.  आभार प्रदर्शन अविनाश घोनमोडे विषय शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शाळेतील विषय  शिक्षक घनश्याम शिंदे सर ,वर्षा मूलकलवार मॅडम , मंजू भोयर मॅडम व  धानोरकर सर यांनी खूप मेहनत घेऊन यशस्वी केला. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तथा गावातील युवा समिती याचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments