Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेतक—यांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर — कृषी अधिकारी प्रशांत कासराळे

शेतक—यांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर — कृषी अधिकारी प्रशांत कासराळे 

मूल प्रतिनिधी
 

शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांसाठी व माहितीसाठी कृषी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आपली प्रगती साधावी. शेतकयांच्या कुठल्याही प्रश्न वा समस्यां सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असे मत तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी प्रेस क्लब मूल च्या वतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावात वाढलेल्या प्रशांत कासराळे यांच्याकडे शेतजमीन नाही मात्र त्यांना कृषीविषयक असलेली आत्मीयता त्यांना या क्षेत्रात घेऊन आली. १ली ते दहावी पर्यंत चे शिक्षण मनोविकास विद्यालय कंधार येथे झाले. अकरावी बारावी पर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय कंधार येथे झाले. २०११ ते २०१३ पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी राहूरी जिल्हा अहमदनगर येथे प्रवेश घेतला. २०१२ ला आलेल्या जाहिरातीत महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत एमपीएससी मार्फत निवड झाली.आणि कृषी अधिकारी म्हणून कार्यरत झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे २०१४साली पहिल्यांदा कार्याची धूरा सांभाळली ती २०१९ पर्यंत या कार्यकाळात बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळाले. मात्र त्यानंतर २०१९मध्ये मूल येथे बदली झाली आणि नवीन जबाबदारी सह नवनवीन आव्हाने स्वीकारून त्यांना सामोरे जात यशस्वी होता आले हीच तर त्यांच्या कार्याची दखल घेणारी घटना ठरली व आयुष्यच बदलून गेल्याचे स्पष्ट केले. २०२१ ते २०२३ या काळात राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे बदली झाल्याने तिथे जावे लागले. २०२३ मध्ये परत मूल येथे बदली वर परत आले. 


महाडिबीटिवर असलेल्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना विशिष्ट योजनेचा लाभ द्या म्हणण्याची वेळ येत नाही. असेही एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतांनाच ७२तासाचे आत पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करावयाचे असतांनाच १२हजारावर अर्ज दाखल झाले. पिक विमा कंपनीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले अर्ज पूर्ण प्रक्रिया करुन रितसर सादर केले. शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले ही बाब आमच्या कार्यालयासाठी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंददायी बाब आहे. कारण संपूर्ण विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्तांना अर्ज सादर करणारे मूल तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे अग्रस्थानी आहे.
पीएमकिसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत असून योग्य ते सहकार्य करीत आहोत असे कासराळे यांनी सांगितले. मूल तालुक्यात १११गावात १०४खरीपाची गावे २७७५०हेक्टर जमीन तर ,७ रब्बीच्या गावात ५२७९हेक्टर जमीन असून उन्हाळी पिके घेणारी ८४हेक्टर शेतजमीन असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

Post a Comment

0 Comments