Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे क्रिकेटचा महासंग्राम, मातब्बर उतरणार मैदानात, "महालक्ष्मी व हिमालया" ग्रुप आमने सामने

मूल येथे क्रिकेटचा महासंग्राम, मातब्बर उतरणार मैदानात, "महालक्ष्मी व हिमालया" ग्रुप आमने सामने

मूल (अमित राऊत)

मूल शहरात गुड मॉर्निंग ग्रुप "महामुकाबला क्रिकेटचा महासंग्राम 2024" म्हणजेच महालक्ष्मी विरुद्ध हिमालया या दोन ग्रुप चा आमने-सामने महामुकाबला 25 फेब्रुवारी 2024 रविवारला सकाळी 6 वाजता कर्मवीर मैदानावर होणार आहे. या सामन्यात मूल शहरातील मातब्बर व्यक्तीचा मुकाबला होणार आहे.

महालक्ष्मी ग्रुपचे कर्णधार दिनेश गोयल असुन या गटाकडून हिरेन शहा, राकेश रत्नावार,  नितीन येरोजगार, प्रशांत समर्थ, चंदू मार्गोनवार, अविनाश गरपल्लीवार, अरविंद गिरी, सुरेश फुलझेले, नरेश बोमनवार,  किशोर कापगते, अरुण आत्राम,  राहुल येनप्रेडीवार, गिरीश केशवाणी, डेव्हिड खोब्रागडे, विजय भोयर, अश्विन पॉलीकर, यांचा समावेश आहे. 

हिमालया ग्रुपचे कर्णधार जीवन कोंतमवार असून या गटात डॉ. दिनेश वऱ्हाडे, सचिन चिंतावार, अमोल बच्चूवार, प्रशांत लाडवे, विजय केशवानी, श्रीकांत बुक्कावार, संतोष पालांदुरकर, साई चिमड्यालवार, रुपेश मारकवार, किशोर गोगुलवार, संजय भुसारी, प्रशांत उराडे, महेश गाजुलवार, वैभव गोगीरवार, शेंडे सर, लवनीश उधवानी यांचा समावेश आहे.

महालक्ष्मी आणि हिमालया या दोन्ही गटातील सर्व मातब्बर सभासद हे मूल शहरातील प्रसिद्ध असा ग्रुप "गुड मॉर्निंग ग्रुप" चे सर्व सभासद आहेत. मात्र सध्या दोन्ही विरोधी असून एकमेकांसोबत लढतीचा सामना लढणार आहेत. जणू भारत पाकिस्तान याप्रमाणेच दोन्ही गटाचे खेळाडू सराव करीत आहेत.  दोन्ही गट गब्बर आणि मातब्बर असल्याने जंगी मुकाबला मूलवासीयांना बघायला मिळणार आहे. 25 फेब्रुवारी 2024 रविवारला होणाऱ्या "क्रिकेटचा महासंग्राम 2024" मध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments