Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रगतीचा आलेख मुलांच्या सादरीकरणातून दिसतो - मुख्याध्यापक पुंडलिक घुगल

प्रगतीचा आलेख मुलांच्या सादरीकरणातून दिसतो - मुख्याध्यापक पुंडलिक घुगल

मूल (अमित राऊत)


विद्यार्थी वर्षभर जे काही शिकले, ज्या पद्धतींचा त्यांनी वर्षभर अभ्यास केला आणि कार्यपुस्तिकांवर सराव केला त्यांचा यशस्वी आलेख त्यांनी तयार केलेल्या भाषा आणि गणित विषयांच्या मॉडेल मधून तसेच सादरीकरणातून दिसून येतो असे मत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळाचे मुख्याध्यापक पुंडलिक घुगल यांनी व्यक्त केले.

टीचर इनोव्हेटर कार्यक्रमातून शिक्षकांना ज्या पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते ते तसेच मुलांचा आत्मविश्वास  वाढविण्यासाठी मुले बोलकी करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होतो असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. 
भद्रावती तालुक्यातील जि.प. उच्च प्राथ शाळा गवराळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सीखे इंडिया उत्सवात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी भाषा आणि गणित विषयांचे नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करून पालक आणि  ग्रामस्थांसमोर अतिशय उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले तसेच विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन सर्वांची मने जिंकली. मागील वर्षभर सिखे संस्था मुंबई च्या वतीने शिकवण्यात आलेल्या टीआयपी कार्यक्रमाच्या पद्धती विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या आणि आपल्या कार्यपुस्तिकेत त्यांचा सराव केला. या पद्धतींचे जेव्हा प्रदर्शन भरवण्यात आले  त्यावेळी ज्या पद्धती विद्यार्थी वर्गात शिकले त्यांचे उत्तमरीत्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यानी गणित व भाषा विषयाचे मॉडेल्स तयार केले. यात अपूर्णांकावर आधारित अपूर्णांकाची ओळख, संख्यारेषा, भाजीपाल्याचे शेत, वर्गातील ग्रंथालय, खेळाचे कपाट, माझा मनोरा, क्रिकेटचे मैदान, तर भाषेत विद्यार्थ्यांचे स्वतः तयार केलेल्या गोष्टींची पुस्तके, गोष्ट तक्ता, गोष्टीचा डोंगर, गोष्टींचे घटक काय असतात याचे सादरीकरण केले. या प्रदर्शनाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करून व फित कापून करण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून घोषणाबाजी करून सर्वांना प्रदर्शन बघण्याकरिता आमंत्रित केले. 

या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक, महिला मंडळ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उद्घाटना प्रसंगी  हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. यास आमचा नेहमीच पाठिंबा राहील अशी भावना व्यक्त केली. या प्रदर्शनात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक  पुंडलिक घुगुल, सहशिक्षक उर्मिला बोंडे, प्रतिभा धकाते, प्रिया मसराम, शुभेच्छा साठे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समितीचे  सतीश माहुरे, माता पालक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम सीखे कोच कु. पल्लवी वाळके यांच्या मार्गदर्शनखाली यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

0 Comments