Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वर्ग १० वी च्या वर्गमित्रांचा सोमनाथ येथे २५ वर्षानंतर जमावळा, मित्र- मैत्रिणी झाले भाऊक

वर्ग १० वी च्या वर्गमित्रांचा सोमनाथ येथे २५ वर्षानंतर जमावळा, मित्र- मैत्रिणी झाले भाऊक

मूल (अमित राऊत)
मो.9420181841


मूल तालुक्यांतील डोंगरगाव येथील आश्रम शाळेतील सन २००० मध्ये १० वी ला शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्र मैत्रिणीनी तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले दिनक २५/०२/२०२४ ला सोमनाथ येथे स्नेह भोजनाचे आयोजन करून कुटुंबासहित एकत्र येण्याचा निर्णय घेतला अनेकांचा आनंद गगनात मावत नसल्याचे मत व्यक्त केले तर काही भावुकही झाले १० वी च्या मुलांची निर्मळ मैत्री एकत्र येण्यास कारणीभूत ठरली असेही अनेकांनी व्यक्त झाले वर्ग १० वि ला शिक्षण घेणारे मुरमाडी येथील बेजेंद्र गेडाम यांनी मैत्रीवर गीत सादर करताना मित्र कर तु आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा या गाण्याने अनेकांच्या मनात स्पुर्ती आली. सोमनाथ येथील देवस्थानात शंकर देवाची पूजा सर्वांनी पूजा करून आनंद व्यक्त केला. 

यावेळी चंद्रपूर येथील संतोष नागपूरे; लावरी येथी कोकोडे यांनी वेळात वेळ काढून प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. यावेळी निता नागापुरे, भाविका मेश्राम, आदींनी सामाजिक गीते सादर करून सर्वांचे लक्ष वेधले तर अशोक शेंडे, विश्वकांत जुमनाके, माणिक मेश्राम, संतोष लेनगुरे, राजेश वल्के, प्रकाश पेंदाम, संदीप पोरेड्डीवार, माधुरी आत्राम, अर्चना कोकोडे, दुर्गा शेंडे, प्रियांका उईके,विश्राम सोनकर, अरविंद शेंडे, दिलीप मडावी आदींनी सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments