Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची नितांत गरज - माजी सभापती प्रशांत समर्थ

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची नितांत गरज - माजी सभापती प्रशांत समर्थ 

मूल (अमित राऊत) 

विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मंच उभा करून दिल्यास त्यांच्या अंगी असलेले गुण, कला जगासमोर येईल. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाची नितांत गरज असते. असे प्रतिपादन मूल नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर मूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन तथा विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मूल नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिविल कॉन्ट्रॅक्टर राहुल प्रेमलवार, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डी. के. जनबंधू, प्राध्यापक मोरे, प्रशांत खोब्रागडे, मिलिंद खोब्रागडे, माधुरी कुणावर, सरिता बोप्पावार गीताकोर पटवा, संगिता गुंतीवार, अतुल मडावी, सचिन आंबेकर, मिथुनसिंग पटवा आदी पाहुणे उपस्थित होते. 

पुढे बोलतांना प्रशांत समर्थ म्हणाले शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन योग्य ते मार्गदर्शन केल्यास उत्कृष्ट विद्यार्थी घडण्यास मदत होते. जिल्हा परिषद शाळेची स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्याकरिता शासन आणि आपल्याला मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाळेचे मुख्याध्यापक के.टी. खोब्रागडे यांनी केले. आभार प्रदर्शन कल्पना देवगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रधार डी.एस.भडके होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, नकल आदी सादर केले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments