Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालूक्यातील समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर - जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

मूल तालूक्यातील समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर - जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

मूल (अमित राऊत)


मूल शहरात भव्य दिव्य असा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या संकल्पनेतुंन जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांनी उद्घाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना मुल शहर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून शिवसेना(उ.बा.ठा.)पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सर्वानी करा. राज्यात सरकार कुणाची भाजपा ची की भ्रष्ट लोकाना सोबत घेऊन वाशिंग मशीन मधे धुतलेल्या ग्यारंटी सरकारची असा सवाल यावेली बोलताना केला. जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे असे प्रतिपादन प्रशांत दादा कदम जी यांनी केले.

ज्यांचे सकल्पनेतुन साकार झालेले भव्य दिव्य कार्यालय च्या उद्घाटन प्रसंगी  मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोर गरीब जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले जाणार आहे. शासनाच्या विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या जाणार असून याचा लाभ जनतेला दिला जाणार आहे. हे कार्यालय विकासाचे केंद्र बिंदू ठरेल असे काम या कार्यालयाच्या माध्यमातून होईल.  शिवसेना (उ.बा.ठा.)पक्ष मुल शहरात तालुक्यात मजबूत करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. अबकी बार भाजपा हद्दपार, महाविकास आघाड़ीचाच उमेंदवार बल्लारपुर मूल विधानसभा मधुन निवडून आननार असे संकल्प यानी व्यक्त केले. 

या वेळी उदघाटन समारोह प्रसंगी उपजिल्हा प्रमुख सिक्की भैया यादव, प्रा.शलिकजी फाले, पक्ष मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास उपस्थित मान. प्रमोद भाऊ पाटील, पोंभूर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार, शहर प्रमुख गणेश वासलवार,गोंडपीपारी तालुका प्रमुख सूरज माडूरवार चंद्रपूर तालुका प्रमुख विकास विरुटकर तालुका प्रमुख प्रकाश पाठक ,महिला संघटीका कल्पनाताई गोरघोटे,मनस्वीताई गिऱ्हे,उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यानी केले तर कार्यक्रम यशस्वी करन्या साठी युवा सेना तालुका प्रमुख रीतिक संगमवार शहर प्रमुख आकाश राम युवा सेना शहर प्रमुख अमित अयलानी, जेस्ट शिवसैनिक महेश चौधरी, तालुका संघटक रवि शेरकी,शंकर पाटेवार, वाढई,सुनील काळे मनोज मोहूले, संदीप निकुरे, सागर देऊरकर,रीतिक मेश्राम, शुभम आकुलावार,चेतन मुंगमोडे, छोटू आगबत्तुनवार नयन यलचलवार,विनोद चलाख,किरण शेंडे,शरद आत्राम,महिला आघाड़ी रजनी ताई झाड़े अंजुताई कुनघाडाकर शामलताई बोबाटे,शालू बाई बोबाते दामोदर रेड्डीवार,रूपेश जांबूलवार,प्रमोद ठाकुर, टिपुल चावरे,विनोद कोमलवार व आदी शेकड़ों मुल तालुक्याचे शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी महिला आघाड़ी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments