Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश सचिव अक्षय वाल्मीक यांची मूल नगरपरिषदेस भेट, सफाई कामगारांच्या समस्येबाबत केली चर्चा

महाराष्ट्र प्रदेश सचिव अक्षय वाल्मीक यांची मूल नगरपरिषदेस भेट, सफाई कामगारांच्या समस्येबाबत केली चर्चा 

मूल प्रतिनिधी


महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दि.06/10/2023 रोजी च्या पत्रानुसार वंशपरंपरागत सफाईचे काम करणारे घटकांचे महाराष्ट्र राज्यात किती प्रमाणात पुनर्वसन झाले आहे. याबाबींचा आढावा घेण्याकरिता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री.दिलीप अण्णा चांगरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक यांनी मुल नगरपरिषद येथे भेट घेऊन चर्चा केली.

राज्यातील महानगरपालिकेतील, नगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कामगारांची सेवा 25 वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे, अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सफाई कामगारांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास अशा सफाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास महानगरपालिका नगरपालिका कडून मालकी हक्काने मोफत सदनिका देणे बाबत शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला असुन सुद्धा नगर परिषद मुल प्रशासन तर्फे अद्यावद सदर योजनेचा लाभ पात्र कर्मचारींना देण्यात आलेला नाही.

तसेच सेवानिवृत्त कर्मचारींना रजारोखीकरण व सेवाउपादान ची रक्कम प्राथमिकतेने दिल्या बद्दल मुल नगरपरिषद प्रशासन चे आभार सुद्धा व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष श्री.सुनिल महातव, मुल शाखा अध्यक्ष श्री.संदीप पारचे व ग्राहक दक्षता कल्याण चे महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री.किरण आठवले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments